English

वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळकंसाचे माप 54° असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. (π =3.14) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळकंसाचे माप 54° असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. (π =3.14) 

Sum
Advertisements

Solution

दिलेले: त्रिज्या (r) = 10 सेमी

वर्तुळकंसाचे माप (θ) = 54°

शोधा: वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ

उकल: 

वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = `θ/360 xx pir^2` 

= `54/360 xx 3.14 xx (10)^2`

= `3/20 xx 3.14 xx 100`

= 3 × 3.14 × 5 = 15 × 3.14

= 47.1 सेमी

∴ वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 47.1 सेमी2 आहे. 

shaalaa.com
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ (Area of a sector)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.3 [Page 154]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.3 | Q 1. | Page 154

RELATED QUESTIONS

वर्तुळपाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळकंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. 


3.4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती 12.8 सेमी आहे तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.


आकृतीत A(P-ABC) = 154 चौसेमी आणि वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल, तर

(1) ∠APC चे माप काढा.

(2) कंस ABC ची लांबी काढा.

 


वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

30°


वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

210°


वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

3 काटकोन


आकृतीत `square`PQRS हा आयत असून PQ = 14 सेमी, QR = 21 सेमी, तर आकृतीत दाखविलेल्या x, y आणि z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा.

 


ΔLMN हा समभुज त्रिकोण आहे. LM = 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून,

(1) A (ΔLMN) = ?

(2) एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

(3) तीन वर्तुळपाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ काढा.

(4) रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. 


आकृतीत P हा वर्तुळाचा केंद्र असून रेख AB ही जीवा आहे. PA = 8 सेमी आणि जीवा AB वर्तुळकेंद्रापासून 4 सेमी अंतरावर असेल, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ A काढा. (π = 3.14, `sqrt3` = 1.73)

 


वर्तुळपाकळी A-PCQ मध्ये `square`ABCD हा चौरस आहे. C - BXD या पाकळीची त्रिज्या 20 सेमी असेल तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती करा.

उकल: चौरस ABCD ची बाजूृ = वर्तुळपाकळी C - BXD ची त्रिज्या = `square` सेमी 

चौरसाचे क्षेत्रफळ = बाजूृ= `square^2` = `square` ...(l)

चौरसातील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ = चौरस ABCD चे क्षेत्रफळ - वर्तुळपाकळी C - BXD चे क्षेत्रफळ

= `square - θ/360 xx pir^2`

= `square - 90/360 xx 3.14/1 xx 400/1`

= `square - 314`

= `square`

मोठ्या वर्तुळपाकळीची त्रिज्या = चौरस ABCD च्या कर्णाची लांबी

= `20sqrt2`

माेठ्या वर्तुळपाकळीतील चौरसाबाहेरील रेखांकित भागाचे क्षेत्रफळ

= वर्तुळपाकळी A - PCQ चे क्षेत्रफळ - चौरस ABCD चे क्षेत्रफळ

= A(A - PCQ) - A(`square` ABCD)

= `(θ/360 xx pi xx r^2) - square^2`

=  `90/360 xx 3.14(20sqrt2)^2 - (20)^2`

= `square - square`

= `square`

∴ रेखांकित भागाचे एकूण क्षेत्रफळ = 86 + 228 = 314 चौसेमी 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×