English

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा. - Marathi

Advertisements
Advertisements

Questions

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या कोणत्याही दोन बाबी लिहा.

Very Long Answer
Advertisements

Solution

  1. वृत्तलेख वाचकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत जे अस्पर्शित आहे, ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो.
  2. वाचक नेहमीच वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते.
  3. वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो.
  4. वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते.
  5. वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो.
  6. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो, त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो.
  7. वृत्तलेखात शैली ह्या घटकावरही लक्ष दयावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यांतून वृत्तलेखनातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते.
  8. वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते.
shaalaa.com

Notes

Students should refer to the answer according to their questions.

वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.04: वृत्तलेख - कृती [Page 110]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 4.04 वृत्तलेख
कृती | Q 4 | Page 110

RELATED QUESTIONS

वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.


बातमी आणि वृत्तलेख यांतील फरक स्पष्ट करा.


वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाचे स्रोत.


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा


थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.


वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा


बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.


वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.


वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.

त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.


‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.


‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.


व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.


वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.


खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.

वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.


वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

बातमीवर आधारित वृत्तलेख - व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख - मुलाखतीवर आधारित वृत्ललेख - ऐतिहासिक स्थळ - गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×