Advertisements
Advertisements
Question
पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
Advertisements
Solution
दिनांक: १० नोव्हेंबर, २०२२.
प्रिय यश,
अभिनंदन! अभिनंदन!! हार्दिक अभिनंदन!!!
अंशुल स्पोर्टस् क्लबने आयोजित केलेल्या फूटबॉल शिक्षण शिबिरात सहभागी होऊन विशेष प्रावीण्यासह प्रशस्तीपत्रक मिळविल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन.
यश, किती सुंदर खेळतोस तू! तुला फूटबॉल खेळण्याची लहापणापासून आवड आहे. त्यातही फूटबॉल खेळाला तू विशेष पसंती देतोस. जिम व योगविद्या यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण तू अगोदरच घेतले आहेस. फूटबॉल खेळासाठी आवश्यक असे गुणविशेष तुझ्या व्यक्तित्वात आहेत. तुझी लक्षणीय उंची, उत्तम आरोग्य, जिद्द, चपळता व सातत्याने सराव करण्याची चिकाटी यामुळे फूटबॉल खेळात तू प्रावीण्य मिळविले आहेस. आपल्या शाळेतील क्रीडाशिक्षक श्री. अशोक पाटील सर यांचेही मार्गदर्शन तुला मिळाले आहे. तुझे आजोबाही क्रीडापटू होते असे माझे आजोबा सांगत होते. याचाच अर्थ असा की, खेळातील प्रावीण्य हा तुला अनुवंशिक गुण मिळाला आहे.
अंशुल स्पोर्टस् क्लबने तुझ्यातील क्रीडानैपुण्य टिपून तुझी व्यावसायिक खेळाकरिता निवड केली आहे. ही माझ्यासाठी खरोखर आनंदाची बाब आहे. मी माझ्या घरी जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा माझ्या आईबाबांनाही तुझे खूप कौतुक वाटले. त्यांनीही तुला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
पुनश्च अभिनंदन! भविष्यातही अशीच प्रगती करीत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा! ती. स्व. काकाकाकूंना माझा साष्टांग नमस्कार. तुझ्या छोट्या भावाला चिरंजीव सुहासला शुभाशीर्वाद. तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत आहे.
तुझा मित्र,
वरद नाईक
विदयार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यालय,
नागपूर - 440001
ई-मेल आय.डी. - [email protected]
