English

विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. शेताचे क्षेत्र २०० हेक्‍टर किंवा अधिक असते.
  2. मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळे ही शेतीयंत्रांच्या साहाय्याने केली जाते. उदा., नांगरणीसाठी ट्रॅक्‍टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो.
  3. एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदा., गहू किंवा मका. याशिवाय बार्ली; ओट्स, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात.
  4. या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. उदा., यंत्रखरेदी, खते, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते.
  5. अवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड तसेच बाजारभावातील चढउतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत.
  6. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: कृषी - स्वाध्याय [Page 166]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (3) c | Page 166
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×