English

वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

वाहतुकीमुळे व्यापार, उद्योगधंद्यांना चालना मिळते. वाहतुकीमुळे लोक एकत्र येतात. त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तूंची उपलब्धता वाहतुकीमुळेच करता येते. नैसर्गिक आपत्ती, पर्यटन, प्रवास यांमध्येही वाहतुकीच्या सोयी महत्त्वाच्या भूमिका बजावतात. थोडक्यात प्रदेशाचा आर्थिक, सामाजिक, औद्योगिक विकास वाहतुकीच्या साधनांच्या विकासावरच अवलंबून असतो.
अशा या महत्त्वपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा विकास मात्र अनेक भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक घटकांवर अवलंबून असतो. त्यांपैकी वाहतुकीवर प्रभाव पाडणारे भौगोलिक घटक पुढीलप्रमाणे आहेत :
(१) भूरूप: वाहतुकीची सोय सपाट प्रदेशात चांगल्या प्रकारे विकसित होते. म्हणूनच नदयांच्या मैदानी प्रदेशात वाहतुकीचे दाट जाळे आढळते. अशाच प्रकारचा प्रभाव किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशातही दिसून येतो. याउलट वाळवंटी प्रदेश, दलदलीचे प्रदेश व पर्वतीय भूरूपे असलेल्या जमिनीवर वाहतूक साधने विकसित करण्यात फार अडचणी येतात.
(२) हवामान: अतिशीत, अतिउष्ण किंवा अति पर्जन्याच्या प्रदेशात वाहतूक मार्गांचा विकास करण्यात अडचणी येतात. उदा., कॅनडाच्या उत्तरेकडील प्रदेश किंवा सहारा वाळवंटात वाहतूक मार्गांचा विकास झालेला नाही.

shaalaa.com
वाहतूक
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: तृतीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 65]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 6 तृतीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ६. २) | Page 65

RELATED QUESTIONS

तृतीयक व्यवसाय


ट्रान्स ऑस्ट्रेलिया लोहमार्ग स्थानक


हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे.


फरक स्पष्ट करा.

जलवाहतूक व हवाई वाहतूक.


खालील माहिती नकाशात भरा व सूची दया.
१) सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा
२) दोन खंडांदरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग 
३) भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ
४) भारतातील एक महत्त्वाचे बंदर  


साखळी पूर्ण करून उत्तर पुन्हा लिहा.

अ.नं ‘अ’ ‘ब’ ‘क’
1. ग्राहकोपयोगी वस्तू  (i) अटलांटिक महासागर (अ) औषधी उत्पादन
2. पनामा कालवा (ii) सुपीक प्रदेश (ब) परिस्थितीकीय संतुलन 
3. मैदाने (iii) थेट वापरासाठी तयार (क) शेती व्यवसाय विकास
4. अन्नसाखळी (iv) अल्पकालीन (ड) पॅसिफिक महासागर
5. स्थलांतर (v) परिसंस्था (इ) अरबी समुद्र
    (vi) हिंदी महासागर (फ) दीर्घकालीन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×