Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) चौकट पूर्ण करा. (२)
| i. शिक्षकदिनाच्या दिवशी फार कमी निवडले जायचे ते पद | ______ |
| ii. समुद्रकिनारी वाळूचे शिल्प बनवणारे | ______ |
| आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षकदिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी; पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं, तरी ते असं करायचं, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाइलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्सपण महत्त्वाची असते. तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात; पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे, की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. |
२) जोड्या जुळवा. (२)
| 'अ' गट | 'ब' गट |
| क्रिकेटच्या सामन्याचा निर्णय ठरवणारी | नर्स |
| हा नसेल तर मोबाइलचा उपयोग नाही | बिस्मिल्लाह खान |
| डॉक्टर बरोबर ही असावीच लागते | खेळपट्टी |
| सनई वादनाने लोकप्रिय झालेले | चार्जर |
३) स्वमत- (३)
शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी तुम्ही कोणते पद स्वीकारता किंवा कोण व्हायला आवडते व का? ते लिहा.
Advertisements
Solution
१)
| i. शिक्षकदिनाच्या दिवशी फार कमी निवडले जायचे ते पद | शिपाई |
| ii. समुद्रकिनारी वाळूचे शिल्प बनवणारे | ओरिसाचे सुदर्शन पटनायक |
२)
| 'अ' गट | 'ब' गट |
| क्रिकेटच्या सामन्याचा निर्णय ठरवणारी | खेळपट्टी |
| हा नसेल तर मोबाइलचा उपयोग नाही | चार्जर |
| डॉक्टर बरोबर ही असावीच लागते | नर्स |
| सनई वादनाने लोकप्रिय झालेले | बिस्मिल्लाह खान |
३)
मला लहानपणापासूनच मराठी भाषा आणि मराठी भाषेचे शिक्षक यांविषयी कायम आपलेपणा वाटत आला आहे. मोठेपणी आपणसुद्धा मराठी भाषेचे शिक्षक बनावे अशी माझी इच्छा आहे. मराठी भाषा शिकवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी मराठी विषय शिक्षक हे पद स्वीकारतो. मराठी कविता शिकवताना, त्या चाल लावून म्हणताना एक वेगळाच आनंद मला मिळतो. आपली मातृभाषा जगली पाहिजे व त्यासाठी आपलादेखील हातभार लागावा याकरता मी याची सुरुवात म्हणून शाळेतील शिक्षकदिनाच्या दिवशी मराठी विषय शिक्षक बनतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे लिहा.
पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______
कारणे लिहा.
आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
आप्पांचे शिक्षणप्रेम - ______
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
स्वच्छता - ______
चौकटी पूर्ण करा.

‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
