Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा: (2)

| माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्याएवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो! माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. |
(2) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा: (2)
- दिवसभराच्या खेळाने लेखकाला भूक तर खूपच लागलेली असायची -
- लेखकाचा जन्म मुंबईत गरीब कुटुंबात झाला -
- लेखकाचे वडील बँकेमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते -
- लेखक लहानपणी खोडकर होते -
(3) स्वमत: (3)
तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
Advertisements
Solution
(1)

(2)
- हे विधान बरोबर आहे.
- हे विधान चूक आहे.
- हे विधान चूक आहे.
- हे विधान बरोबर आहे.
(3)
वडिलांच्या बदलीमुळे लेखकाला पुण्यात काकांकडे राहावे लागले. काका राहत असलेली संस्था खेळासाठी प्रसिद्ध असल्याने तेथे येणाऱ्या अनेक खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी लेखकाला मिळाली. अधिक खेळायला मिळावे, म्हणून लवकर येणाऱ्या खेळाडूंना चेंडू फेकण्यासाठी लेखक उत्साहाने जात असत. खेळाडूही त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून मुद्दाम आऊट होत. लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात व लगेच उचलून फेकण्यात त्यांना समाधान वाटे. आपणही या खेळाडूंप्रमाणे खेळावे, ही इच्छा लेखकाच्या मनात येई. आपणही क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी पक्के ठरवले. अशाप्रकारे, क्रिकेट पाहता पाहता, खेळण्यात सहभागी होता होता लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजले.
