English

"त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते.” हे सिद्‌ध करा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

"त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते.” हे सिद्‌ध करा.

Theorem
Advertisements

Solution

पक्ष: ΔABC मध्ये रेषा l || रेख BC आणि रेषा l ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते.

साध्य: `"AP"/"PB" = "AQ"/"QC"`

रचना: रेख PC व रेख BQ काढा.

सिद्धता: ΔAPQ आणि ΔBPQ यांचा Q हा सामाईक शिरोबिंदू आहे आणि त्यांचे AP व BP हे पाया AB या एकाच रेषेवर आहेत. त्यामुळे हे समान उंचीचे त्रिकोण आहेत.

`therefore ("A"(Delta "APQ"))/("A"(Delta "BPQ")) = "AP"/"PB"`    ...(i) [समान उंचीचे त्रिकोण]

तसेच, ΔAPQ आणि ΔCPQ यांचा P हा सामाईक शिरोबिंदू आहे आणि त्यांचे AQ व QC हे पाया AC या एकाच रेषेवर आहेत. त्यामुळे हे समान उंचीचे त्रिकोण आहेत.

∴ `("A"(Delta "APQ"))/("A"(Delta "CPQ")) = "AQ"/"QC"`   ...(ii) [समान उंचीचे त्रिकोण]

ΔBPQ व ΔCPQ यांचा रेख PQ हा समान पाया आहे.

ΔBPQ आणि ΔCPQ हे PQ व BC ह्या दोन समांतर रेषांमध्ये बद्‌ध आहेत.

∴ ΔBPQ व ΔCPQ ची उंची समान आहे.

∴ A(ΔBPQ) = A(ΔCPQ)   ...(iii) [समान उंची व समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात.]

∴`("A"(Delta "APQ"))/("A"(Delta "BPQ")) = ("A"(Delta "APQ"))/("A"(Delta "CPQ"))`   ...(iv) [(i), (ii) आणि (iii) वरून]

∴ `"AP"/"PB" = "AQ"/"QC"`   ...[(i), (ii) व (iv) वरून]

shaalaa.com
प्रमाणाचे मूलभूत प्रमेय
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official

RELATED QUESTIONS

जर Δ PQR मध्ये PM = 15, PQ = 25, PR = 20, NR = 8 तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? कारण लिहा.

 


आकृतीत काही कोनांची मापे दिली आहेत त्यावरून दाखवा, की `"AP"/"PB"= "AQ"/"QC"`

  


दिलेल्या आकृती मध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात X हा एक कोणताही बिंदू आहे. बिंदू X हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडला आहे. तसेच रेख PQ || रेख DE, रेख QR || रेख EF तर रेख PR || रेख DF हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा.

सिद्धता: Δ XDE मध्ये PQ || DE .............. `square`

∴ `"XP"/square = square/"QE"` ...........(I) (प्रमाणाचे मूलभूत प्रमेय )

Δ XEF मध्ये QR || EF ................. `square`

∴ `square/square` = `square/square`  ..........(II) `square`

∴ `square/square` = `square/square`  .......... विधान (I) व (II) वरून

∴ रेख PR || रेख DF .......... (प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास) 


आकृती मध्ये A – D – C व B – E – C . रेख DE || बाजू AB. जर AD = 5, DC = 3, BC = 6.4 तर BE काढा.


आकृतीमध्ये रेख DE || रेख BC, तर पुढीलपैकी सत्य विधान कोणते?

 


आकृतीमध्ये रेषा BC || रेषा DE, AB = 2, BD = 3, AC = 4 व CX = x तर x ची किंमत काढा.


आकृतीमध्ये रेख PQ || बाजू BC, AP = x + 3, PB = x - 3, AQ = x + 5, QC = x – 2, तर x ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा.

∆PQB मध्ये रेख PQ || बाजू BC.

`"AP"/"PB" = "AQ"/square` ...........[`square`]

`(x + 3)/(x - 3) = (x + 5)/square`

(x + 3) `square` = (x + 5) (x– 3)

x2 + x – `square` = x2 + 2x – 15

x = `square` 


आकृतीमध्ये, PS = 2, SQ = 6, QR = 5, PT = x आणि TR = y, तर x व y च्या योग्य किमतीच्या अशा जोड्या शोधा, की ज्यामुळे रेषा ST || बाजू QR असेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×