English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल, याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

Long Answer
Advertisements

Solution

तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय नक्कीच वाढवू शकेल. त्यासाठी त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. विविध समाजमाध्यमांवर बांगड्यांच्या जाहिराती टाकून तो ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. त्या जाहिरातींसोबतच आपला व्यवसाय ‘डिजिटल’ पद्धतीने सर्वत्र पोहोचवण्यासाठी तो स्वत:चे ‘ॲप’ विकसित करू शकतो. त्या ॲपवर तऱ्हेतऱ्हेच्या बांगड्यांचे नमुने पेश करून, आकर्षक सवलती (ऑफर्स) देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. शिवाय, ऑनलाइन मार्केटिंग सुरू करून तो देशातच नाही, तर परदेशातूनही मागणी मिळवून आपला व्यवसाय वाढवू शकतो.

शिवाय, बांगड्या बनवण्यासाठीची नवीन यंत्रसामग्री विकत घेऊन तो विविध प्रकारच्या (लाखेच्या, काचेच्या, प्लास्टिकच्या), विविध रंगांच्या, आकाराच्या बांगड्या बनवू शकतो व आपला व्यवसाय वाढवू शकतो.

shaalaa.com
चुडीवाला
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: चुडीवाला - कृती [Page 22]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 6 चुडीवाला
कृती | Q (७)(इ) | Page 22
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×