Advertisements
Advertisements
Question
टीपा लिहा.
हवामानशास्त्र
Short/Brief Note
Advertisements
Solution
हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. तापमान, हवेचा दाब, वारा इत्यादी विविध चलांवर अवलंबून हवामानाचा अंदाज केला जातो कारण ते वेळेनुसार बदलतात. यात हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट या व अशा अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. यावरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. याचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, विमानसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.
shaalaa.com
हवामानशास्त्र
Is there an error in this question or solution?
