Advertisements
Advertisements
Question
टिपा लिहा.
ब्राझीलमधील वाहतुक
Advertisements
Solution
- ब्राझीलमध्ये एकूण वाहतूक मार्गांमध्ये रस्ते मार्ग सर्वाधिक आढळतात.
- ब्राझीलमध्ये रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली दिसते. पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यांमुळे या देशात रस्ते मार्गांचा विकास मर्यादित झाला आहे.
- ब्राझीलमध्ये लोहमार्गांचा विकास कमी झालेला आहे. रेल्वेवाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग काही शहरांपुरता मर्यादित आहे.
- ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीतून व्यापारीतत्त्वावर जल वाहतूक केली जाते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वांत लांब पल्ला (सुमारे ३७०० किमी) ॲमेझॉन नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्वीटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते.
- पॅराना ही महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी जल वाहतुकीसाठी उपयुक्त आहे.
- किनारीभागात सागरी जल वाहतूक केली जाते.
- ब्राझीलमध्ये हवाई वाहतुकीचे योगदान मर्यादित आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते सकारण सांगा.
ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?
खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.

भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
भौगोलिक कारणे लिहा.
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
फरक स्पष्ट करा.
ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक
फरक स्पष्ट करा.
भारतातील वाहतूक व ब्रझील वाहतूक
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झाला आहे.
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न:
- नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
- नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे?
- ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल?
- बोआ विस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?
- ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.
