Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
कोणत्याही व्यक्तीतील साधुत्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक तुम्हांला महत्त्वाचा वाटतो, ते स्पष्ट करा.
- त्याची देवभक्ती
- त्याची तपश्चर्या
- त्याचे सामाजिक कार्य
Explain
Advertisements
Solution
कोणत्याही व्यक्तीतील साधुत्व ओळखण्यासाठी ‘त्याचे सामाजिक कार्य’ महत्त्वाचे ठरते. साधुत्व ओळखण्यासाठी त्याचे सामाजिक कार्य महत्त्वाचे आहे कारण त्यांचं सामाजिक क्रियांने त्यांचे व्यक्तित्व साकारात्मकपणे दाखवतात. समाजातील दु:ख, दैन्य, दारिद्य, विषमता, असमानता यांमुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येते. अशा वेळी दु:खी-पीडितांना सहानुभूतीने मदत करणे, त्यांचे दु:ख जाणून ते दूर करण्याचा प्रयत्न करणे हीच खरी समाजसेवा आहे. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या वचनाप्रमाणे माणसातील देवाची पूजा करणे ही खरी भक्ती!
shaalaa.com
संतवाणी - (आ) जें कां रंजलें गांजलें
Is there an error in this question or solution?
