Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
Advertisements
Solution
शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो, हे खरे आहे. काही वेळा आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात, ती शाखा आपण निवडतो. कालांतराने आपली आपल्याला चूक उमगते. पण उशीर झालेला असतो. त्यानंतर काहीही करता येत नाही. निराश मनाने आपण शिक्षण घेतो अणि आयुष्यभर तशाच मन:स्थितीत जीवन जगत राहतो. त्यात सुख अजिबात नसते.
शिक्षणानंतर नोकरी-व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो. इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. या वेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो. मात्र इथेही एक अडचण असतेच. पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले, तरी नोकरी-व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात. पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी काय करायचे?
अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे? कसे करायचे? तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे, त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्ये पणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. तसेच, एवढे प्रयत्न अपुरे पडले तर आपले काम उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली, तर नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे, असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृती करा.
लेखकाने वर्णिलेली खऱ्या आनंदाची लक्षणे
कृती करा.
माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.
यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा...
हे केव्हा घडेल ते लिहा.
एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा...
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला आकर्षित करणारा - ......
खालील चौकटी पूर्ण करा.
शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
बाहेर दाराशी घुटमळणारा- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंदाला प्रसवणारा- ____________
खालील चौकटी पूर्ण करा.
आनंद अनुभवण्याची निमित्तं- ______ ______
स्वमत.
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
स्वमत.
‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
अभिव्यक्ती.
खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
अभिव्यक्ती.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
शहाणंसुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत. ही सोबत तुम्हांला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काहीजण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात, त्यादृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात; पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वत:च्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वत:ला ओळखू शकता, स्वत:शी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हांला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो, दु:ख त्याच्या वाटेला कधीच जात नाही! आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल, तर ‘आजचं काम उद्या करू’ असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसंतरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? |
(१) सूचनेनुसारपुढील आकृतिबंध पूर्ण करा. (2)
(i)

(ii) आनंद अनुभवण्यासाठी या गोष्टीपासून
मन मुक्त असावं लागत
(२) ‘पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत' या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (2)
(३) स्वमत अभिव्यक्ती- (४)
आनंद मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता येणे शक्य आहे असे लेखकास वाटले?
वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं या विधानाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
किंवा
शिवराज गोर्ले ‘आयुष्य-आनंदाचा उत्सव’ या पाठात त्यांनी आनंद हा प्रत्येक अंतरंगात असून तो मिळविण्यासाठी त्याच्यामध्ये आनंदांचे भान जागे असावे लागते. हा विचार व्यक्त केला आहे.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गंमती - (२)
(य) ______
(र) ______
(२) (य) आनंदाविषयी उताऱ्यात आलेली काव्यपंक्ती - (१)
(र) प्रस्तुत काव्यपंक्तीविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत - (१)
|
आनंद सगळ्यांनाच हवा असतो... पण आपला आनंद नेमका कशात आहे, हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद? कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे! आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच. तो अनुभवता मात्र यावा लागतो. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच. |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
किंवा
‘आनंदाची तुमची संकल्पना’ तुमच्या शब्दांत लिहा.
