Advertisements
Advertisements
Question
संक्षिप्त टिपा लिहा:
सामाजिक चळवळींची कारणे
Short/Brief Note
Advertisements
Solution
- सांस्कृतिक दरी: सांस्कृतिक दरी म्हणजे समाजातील मूल्ये, संकल्पना आणि अपेक्षांमध्येहोणारे वेगवान बदल. जे अपेक्षित आहे आणि जे स्वीकृत आहे त्यामधील अंतर जेव्हा मर्यादेपेक्षा अधिक रुंदावते, तेव्हा परिणामी संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊन त्याची परिणती सामाजिक चळवळीत होऊ शकते.
- सामाजिक विघटन: औद्योगिकीकरण, शहरीकरण यांसारख्या बदलांच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे समाजात असमान व असंतुलित वाढ होऊ शकते. पूर्वप्रस्थापित निकषांशी नवीन मानकांचा संघर्ष होऊ शकतो. एकाच वेळी समाजात जुन्या तसेच नव्या मानकांच्या अस्तित्वामुळे संभ्रमाची भावना निर्माण होऊ शकते.
- संवेदित सामाजिक अन्याय: जेव्हा लोकांच्या एखाद्या समुदायात अधिकाऱ्यांनी/ सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या काही निर्णयांबद्दल असमाधान आणि असंतोष असतो त्यावेळी सामूहिक नाराजी व्यक्त होऊन लोकांमध्ये सामाजिक अन्यायाची भावना निर्माण होते. त्याची परिणती सामाजिक चळवळीमध्ये होते.
- नियमनव्यवस्थेतील ताठरता: योग्य अनुशासनासाठी सुयोग्य असे मानदंड व नियमने समाज सुनिश्चित करत असतो. सामाजिक आचरण पद्धती समाजातील नियमन व्यवस्थेशी जुळणेआवश्यक असते. तथापि काही परिस्थितीत नियमनांची लवचिकता कमी होऊन सर्वसामान्यांच्या अपेक्षांशी जुळत नाही.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
