English

श्री. शांतिलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

श्री. शांतिलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?

Sum
Advertisements

Solution

येथे, दर्शनी किंमत = ₹ 100, बाजारभाव = ₹ 120, लाभांश = 7%, शेअर्सची संख्या = 150

∴ एकूण गुंतवणूक = शेअर्सची संख्या × बाजारभाव

= 150 × 120 = ₹ 18,000

प्रतिशेअर लाभांश = दर्शनी किमतीच्या 7%

`= 7/100 xx 100` = ₹ 7

∴ 150 शेअर्सचा एकूण लाभांश = 150 × 7 = ₹ 1050

आता, परताव्याचा दर = `"एकूण लाभांश"/"एकूण गुंतवणूक" xx 100`

`= 1050/18000 xx 100`

= 5.83%

∴ श्री. शांतिलाल यांच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर 5.83% आहे.

shaalaa.com
दर्शनी किंमत व बाजारभाव तुलना
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: अर्थनियोजन - सरावसंच 4.3 [Page 102]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 अर्थनियोजन
सरावसंच 4.3 | Q 5 | Page 102

RELATED QUESTIONS

श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील?


खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी A साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी B साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे.


दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?


श्रीमती अनघा दोशी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 660 रुपये बाजारभावाचे 22 शेअर्स घेतले, तर त्यांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली? त्या शेअर्सवरती 20% लाभांश घेतल्यावर 650 रुपये बाजारभावाने ते विकले. प्रत्येक व्यवहारात 0.1% दलाली दिली, तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा किंवा तोटा झाला तो काढा. (उत्तर जवळच्या पूर्णांकात लिहा.)


श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1,200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर

  1. शेअर्ससाठीएकूण गुंतवणूक किती रुपये केली?
  2. गुंतवणुकीवर दलाली किती दिली?
  3. दलालीवरील जीएसटी काढा.
  4. 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले?

श्री. आदित्य संघवी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना 50,118 रुपये गुंतवून खरेदी केले. या व्यवहारात त्यांनी 0.2 % दलाली दिली. दलालीवर 18% दराने GST दिला, तर त्यांना 50,118 रुपयांत किती शेअर्स मिळतील?


100 रुपये दर्शनी किमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले, तर किती शेअर्स मिळतील?


जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले, तर किती रुपये मिळतील?


100 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 30 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला. दलालीचा दर 0.3 % आहे, तर एका शेअरची खरेदीची किंमत काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×