English

रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

Question

रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे असणारे रामस्वामी नायकर यांनी समाजसेवेचे पुढील कार्य केले - 

(१) महात्मा गांधींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला.

(२) सर्व जातींना मंदिर-प्रवेश असावा, यासाठी प्रयत्न केले.

(३) अस्पृश्यांवरील निबंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या 'वायकोम सत्याग्रहा'त भाग घेतला.

(४) तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केले.

(५) समाजातील वर्णव्यवस्था, बालविवाह या प्रथांच्या विरोधात लढा उभारला.

(६) स्त्रियांचे हक्क, संततिनियमन या विषयांवर आपले क्रांतिकारक विचार मांडून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला. आपल्या समाजोपयोगी कार्यामुळे रामस्वामी नायकर यांना लोक 'पेरियार' म्हणजे महान आत्मा म्हणून ओळखू लागले.

shaalaa.com
समाजसुधारकांचे कार्य
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा - स्वाध्याय [Page 38]

APPEARS IN

Balbharati Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 5 भारत : सामाजिक व धार्मिक सुधारणा
स्वाध्याय | Q ४.४ | Page 38
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×