English

पुढील उत्ताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: उत्तरे लिहा: (२) कथाकथन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाते - (य) --------------- (र) --------------- - Marathi

Advertisements
Advertisements

Question

पुढील उत्ताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कोशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते.

अलीकडच्या काळात 'कथाकथन' क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करीत आहे. या पार्श्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो.

अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते.

  1. उत्तरे लिहा: (२)
    कथाकथन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाते -
    (य) ---------------
    (र) ---------------
  2. कथेच्या अभिवाचनाचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होण्यासाठी पूरक असलेल्या गोष्टी लिहा. (२)
Comprehension
Advertisements

Solution

  1. (य) आकाशवाणी
    (र) दूरदर्शन
  2. कथेच्या अभिवाचनाचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होण्यासाठी पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना व नेपथ्य या गोष्टी पूरक आहेत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×