English

पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दा‍त लिहा. गुणसूत्रांचे प्रकार स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दा‍त लिहा.

गुणसूत्रांचे प्रकार स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

गुणसूत्रांचे प्रकार पेशी विभाजनाच्या वेळी स्पष्टपणे दिसतात.

  1. मध्यकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे ‘V’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात.

    मध्यकेंद्री
  2. उपमध्यकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे ‘L’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभूजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते.

    उपमध्यकेंद्री
  3. अग्रकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो. व हे ‘j’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते.

    अग्रकेंद्री
  4. अंत्यकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे ‘i’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भूजा असते.

    अंत्यकेंद्री

सामान्यत: कायिक पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसुत्रे आकार व रचनेने सारखी असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्रे (Homologous Chromsomes) म्हणतात तर आकार व रचनेने सारखी नसल्यास त्यांस विजातीय गुणसूत्रे (Heterologous Chromosomes) म्हणतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांत गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यांपेक्षा वेगळी असते. या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे म्हणतात.

shaalaa.com
गुणसूत्रांचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: आनुवंशिकता व परिवर्तन - स्वाध्याय [Page 193]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 16 आनुवंशिकता व परिवर्तन
स्वाध्याय | Q 3. अ. | Page 193
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×