English

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा. बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार तोट्यासह स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.

बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकार तोट्यासह स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

  1. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकाच व्यक्तीला देता येतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. बीने यांची बुद्धिमापन चाचणी, वेश्लर यांची बुद्धिमापन चाचणी, डॉ. भाटीया यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोहेस् यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
    1. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ, पैसा व श्रम जास्‍त खर्च होतात.
    2. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी, चाचण्यांच्या गुणदानासाठी व प्राप्तांकांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते.
  2. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी एकाहून अधिक म्हणजेच अनेक व्यक्तींना देता येतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायाच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
    1. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या प्रत्येकाशी सुसंवादासाठी, सहकार्यासाठी आणि बुद्धिमापन प्रक्रियेतील गोडी टिकवून ठेवण्यासाठी संधी मिळतेच असे नाही.
    2. वैयक्‍तिक चाचण्यांच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात कमी सक्षम असतात.
  3. भाषिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा (शब्दांचा किंवा अंकांचा) वापर करतात, त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. आर्मी आल्फा टेस्ट, वेश्लर अँडल्ट इंटेलिजन्स स्केल (WAIS) इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
    1. इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत.
    2. भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृतीबद्ध असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत वापरता येत नाहीत.
  4. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या: ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात, परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही. त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे (१) कृती चाचणी आणि (२) पेपर-पेन्सिल चाचणी असे दोन प्रकार पडतात. कोह यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पासअलाँग टेस्ट, मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, डॉ. भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. रॅव्हन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस, रॅव्हन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस, इत्यादी अभाषिक पेपर-पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत.
    अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे:
    1. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्‍तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत.
    2. या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्‍वरुपात मापन करीत असल्‍याने सामान्यापेक्षा अधिक बुध्दी असलेल्‍या व्यक्‍तींमध्ये भेद करू शकत नाहीत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×