Advertisements
Advertisements
Question
पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:
कविता: 'दोन दिवस'
| मुद्दे | दोन दिवस |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. |
| (iv) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | |
| (v) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
Complete the Table
Advertisements
Solution
| मुद्दे | दोन दिवस |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | नारायण सुर्वे |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय - | कामगाराच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे चित्रण. |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | ही कविता खरोखरच अंतर्मुख करणारी आहे. कारखान्याच्या झोतभट्टीतील लोखंड शेकल्यासारखेच, स्वतःचे आयुष्य कठीण प्रसंगांतून तावून-सुलाखून घेतल्याचा अनुभव कवितेतून प्रत्ययास येतो. |
| (iv) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश | जीवन कितीही कठीण, प्रतिकूल असले तरी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा, असा आशय या कवितेतून व्यक्त होतो. प्रयत्नांमुळे दुःखांवर मात करता येते आणि जीवन अधिक सकारात्मक पद्धतीने जगण्याची प्रेरणा मिळते. मानवी निश्चय, आशावाद यासारखी मूल्ये ठामपणे कवितेतून व्यक्त होतात. |
| (v) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - | थेट, सडेतोड भाषाशैलीत कामगार जगण्याचे वास्तव चित्रण केले असल्याने ही कविता वाचकाच्या मनाला भिडते. कामगारांच्या आयुष्यातील संघर्ष, कष्ट अनुभवता येतात. त्यांच्या जीवनाबद्दल सहवेदना आणि आदर निर्माण होतो. जीवनाकडे अधिक संवेदनशील नजरेने पाहण्याची जाणीव होते. म्हणूनच, मला ही कविता मनापासून आवडली. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
