English

प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.

Short Answer
Advertisements

Solution

प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून 'साधी राहणी उच्च विचार' असलेल्या जगप्रसिद्ध साहित्यकाराचा परिचय झाल्याची भावना मनात निर्माण होते. अण्णा दीनदुबळ्यांच्या दुःखाचे वास्तव मांडणारे साहित्य निर्माण करत असत. त्याना भौतिक जगातील सुखसुविधांचा मोह नव्हता. मॉस्को मधील बँकेत त्यांच्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असे मानधन जमा असूनही ते अगदी सामान्य वस्ती असलेल्या चिरागनगरातील झोपडीत राहत होते. झोपडीत राहूनच मला दीनदुबळ्यांचे दु:ख अनुभवता येईल व वास्तवावर आधारित साहित्य निर्माण करू शकेल असे त्याचे मत होते. अशा प्रकारे अण्णांच्या रूपाने दीनदुबळ्यांच्या दु:खाची जाणीव असलेल्या एका महान साहित्यकाराचे दर्शन होते. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: अण्णा भाऊंची भेट - स्वाध्याय [Page 6]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 7 अण्णा भाऊंची भेट
स्वाध्याय | Q ४. (ई) | Page 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×