English

प्रकलविभाजनाच्या चार पायऱ्या लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

प्रकलविभाजनाच्या चार पायऱ्या लिहा.

Very Long Answer
Advertisements

Solution

  1. पूर्वावस्था: प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्राकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते.
  2. मध्यावस्था: मध्यावस्थेमध्ये केंद्राकावरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला (मध्य प्रतलाला) समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू यादरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे (तुर्कतंतू) तयार होतात.
  3. पश्चावस्था: पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्यगुणसूत्रे म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन-दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचवले जातात.
  4. अंत्यावस्था: अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचांभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्यकेंद्रके तयार होतात. जन्यकेंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात. तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×