English

‘प्रदूषण-समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

‘प्रदूषण-समस्या व  उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

Writing Skills
Advertisements

Solution

प्रदूषण – समस्या व उपाय

सध्या हवेमधील प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले असल्यामुळे हवा दूषित झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांतून वाचायला मिळतात. प्रदूषण म्हणजे निसर्गातील घटकांचे दूषित होणे. हवा, पाणी, माती व अन्न जर खराब झाले, तर त्याचा परिणाम झाडे, पशुपक्षी आणि माणसांच्या जीवनावर होतो. आरोग्याला व निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या या प्रक्रियेला प्रदूषण असे म्हणतात.

आज प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषणामुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून न्यूमोनिया, क्षय, कॅन्सर यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. अनेक ठिकाणी झाडांची वाढ थांबत आहे. नद्या, समुद्र आणि इतर जलपरिसंस्थांना नुकसान होत आहे. शेतजमिनी नापीक होत चालल्या आहेत. तसेच विहिरी व जलाशय दुर्गंधीयुक्त पाण्याने भरलेले आढळतात. या सर्व समस्या आपल्या लक्षात येऊ लागल्या आहेत.

ही समस्या मानवनिर्मित असल्यामुळे तिचे निराकरणही मानवानेच करणे आवश्यक आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही उपाय करता येऊ शकतात. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केल्यास हवेचे प्रदूषण कमी होऊ शकते. पाण्यात कचरा न टाकणे, सांडपाण्याचा योग्य निचरा किंवा पुनर्वापर करणे यामुळे जलप्रदूषण आटोक्यात येऊ शकते. मोठ्या आवाजाचे वाद्य, ध्वनिक्षेपक तसेच दूरदर्शन व संगीताचा आवाज मर्यादित ठेवल्यास ध्वनिप्रदूषण कमी होईल.

वाहनांमधून निघणाऱ्या धुराची नियमित तपासणी केल्यास हवेचे प्रदूषण रोखता येईल. घरातील व परिसरातील कचरा कमी करणे, त्याचा पुनर्वापर करणे तसेच शेतीत खत व कीटकनाशकांचा मर्यादित वापर करणे यामुळे माती व हवा प्रदूषित होण्यापासून वाचवता येईल. या उपाययोजना वैयक्तिक स्तरावर शक्य असल्या, तरी वस्ती, सोसायटी व गावपातळीवर लोकसहभागातून त्या राबवणे गरजेचे आहे. हवा, पाणी, अन्न व माती यांचा जीवनावर सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×