Advertisements
Advertisements
Questions
मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करा.
मुलाखतीचे स्वरूप थोडक्यात लिहा.
Advertisements
Solution
मुलाखत म्हणजे संवाद. मात्र हा संवाद पूर्वनियोजित असतो. तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो. मुलाखत देणारा, मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा, पाहणारा, वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते. जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसामोर उलगडून दाखवते, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजेच मुलाखत होय. थोडक्यात, दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक, भावनिक संवाद म्हणजेच मुलाखत होय. मात्र या सहेतूक वैचारिक संवादासाठी, म्हणजेच मुलाखतीसाठी व्यक्ती, दिवस, वेळ, स्थळ, विषय, कालावधी, उद्दिष्ट इत्यादी गोष्टी अगोदर ठरवल्या जातात.
मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते. एकावेळी एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते; तसेच एका वेळी एक व्यक्ती अनेक व्यक्तींचीही मुलाखत घेऊ शकते. फोनवरून मुलाखत घेतली जाऊ शकते.
मुलाखत लिखित, मौखिक, ध्वनिमुद्रित, प्रकट अशा विविध स्वरूपाची असते. मुलाखती विचारप्रवर्तक असतात, भावनाप्रधानही असतात. श्रोत्यांचे कुतूहल शमवणाऱ्या, एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या, अनुभव कथन करणाऱ्या, वाङमयीन सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या, पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या... अशा कितीतरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या मुलाखती असतात.
