English

मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी लिहा.

Advertisements
Advertisements

Question

मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी लिहा.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. कोबाल्ट (Co) व निकेल (Ni) या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती.
  2. मेंडेलीव्हने आवर्तसारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे राहिले.
  3. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकित करणे मेंडेलीव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते.
  4. हायड्रोजनचे स्थान : हायड्रोजन हा हॅलोजनांशी (गण VII) साम्य दर्शवतो, जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लुओरिन, क्लोरीन यांची रेणुसूत्रे अनुक्रमे F2, Cl2 अशी आहेत. तसेच हायड्रोजन व अल्क धातू (गण I) यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्येही साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्क धातू (Na, K, इत्यादी.) यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात (गण I) की हॅलोजनांच्या गणात (गण VII) हे ठरवता येत नाही.
shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

RELATED QUESTIONS

थोडक्यात टिपा लिहा.

मेंडेलीव्हचा आवर्ती नियम


मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एका-सिलिकॉनला नंतर ________ हे नाव देण्यात आले.


एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______


गण 13 व 18 : पी खंड : : ______ : डी खंड


बरेलिअम : अल्कधर्मी मृदा धातू : : सोडिअम : ______


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) एका ॲल्युमिनिअम अ) स्कँडिअम
2) एका सिलिकॉन ब) गॅलिअम
3) एका बोरॉन क) जर्मेनिअम
    ड) बेरिलिअम्

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) त्रिके अ) मेंडेलिव्ह
2) अष्टके ब) डोबेरायनर
3) अणुअंक क) थॉमसन
4) अणुवस्तुमानांक ड) मोजले
    इ) न्यूलँड्स

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) s - खंड अ) लँथेनाइड व ॲक्टिनाइड
2) p - खंड ब) गण 3 ते 12
3) d - खंड क) गण 1, 2
4) f - खंड ड) गण 13 ते 18
    इ) शून्य गण

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  इलेक्ट्रॉन संरूपण   संयुजा
1) 2, 2 अ) 1
2) 2, 8, 1 ब) 2
3) 2, 5 क) 3
    ड) 5

आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×