English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) चौकटी पूर्ण करा: (2) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ......... कवीचा जवळचा मित्र - ......... दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) चौकटी पूर्ण करा:   (2)

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - .........
  2. कवीचा जवळचा मित्र - .........

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.

दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

(2) खालील आशयाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.   (2)

  1. ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले.’
  2. कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद.

(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा:   (2)

  1. डोईवर -
  2. दारिद्रय -
  3. हरघडी -
  4. पोलाद -

(4) काव्यसौंदर्य:   (2)

कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

Comprehension
Advertisements

Solution

(1) 

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - हात
  2. कवीचा जवळचा मित्र - अश्रू

(2) 

  1. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.
  2. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो.

(3) 

  1. डोईवर - डोक्यावर 
  2. दारिद्रय - गरिबी
  3. हरघडी - प्रत्येकवेळी
  4. पोलाद - लोखंड

(4) 

कवी नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेत कामगारांच्या आयुष्याचे वास्तववादी चित्रण आढळते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी या कष्टकरी वर्गाला दररोज अपार मेहनत घ्यावी लागते. सततच्या श्रमांमुळे त्यांना आपल्या आयुष्यातील सौंदर्य, तसेच सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वेळच मिळत नाही. रोजच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवण्यातच त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची पडते. गरिबी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते. त्याच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतेची उपेक्षा होते. कष्टांनी भरलेल्या या जीवनाला अश्रूंची साथ असते आणि दु:ख सहन करून त्यावर मात करत पुढे जाण्यासाठी त्यांना सतत मानसिक बळ एकवटावे लागते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×