English

खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

  1. सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात.
  2. परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमानात २००० मीटर खोलीपर्यंत घट होत जाते.
  3. २००० मीटर खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते.
  4. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे ४° से. असते.
  5. खोलीनुसार सागरजलाचे तापमान सुमारे ४° से. पर्यंतच कमी होते, त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही.
  6. विषुववृत्ताजवळ सागरजलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात, तापमानातील फरक कमी असतो.
  7. भूवेष्टित समुद्र व खुल्या सागरजलाच्या तापमानांत भिन्नता आढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्रजलाचे तापमान खुल्या समुद्रजलापेक्षा जास्त असते.
shaalaa.com
सागरजलाचे गुणधर्म - सागरजलाचे तापमान
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सागरजलाचे गुणधर्म - स्वाध्याय [Page 56]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 6 सागरजलाचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 3. (ई) | Page 56
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×