English

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे हे सकारण स्पष्ट करा: एखाद्या व्यक्तीची वेशभूषा पद्धती त्याच्या आधुनिकतेची उंची वाढविते. - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान ‘सत्य’ की ‘असत्य’ आहे हे सकारण स्पष्ट करा:

एखाद्या व्यक्तीची वेशभूषा पद्धती त्याच्या आधुनिकतेची उंची वाढविते.

True or False
Advertisements

Solution

हे विधान असत्य आहे.

कारण:

  1. पेहराव किंवा कपड्यांवरून एखाद्या व्यक्तीच्या आधुनिकीकरणाची पातळी मोजता येत नाही, कारण आधुनिकीकरणाचा थेट संबंध विवेकवादाशी (Rationalism) असतो.
  2. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत नवीन विचार स्वीकारण्याची तयारी, विविध पर्यायांचे परीक्षण करण्याची वृत्ती आणि नवनवीन सर्जनशील मार्ग शोधण्याची क्षमता अंतर्भूत असते.
  3. आधुनिकीकरण म्हणजे चिकित्सक मूल्यमापन करण्याची क्षमता होय. जे लोक स्वतःला आधुनिक मानतात, ते दैनंदिन घटना, साहित्य, संस्कृती, कला, रूढी आणि श्रद्धा यांचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करण्यास तयार असतात.
  4. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत शिक्षणाने जुनाट कल्पना, चुकीच्या समजूत आणि अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत केली आहे. परिणामी, आधुनिकीकरण हे आधुनिक कपड्यांऐवजी तर्कसंगत आणि विवेकी दृष्टिकोनाशी संबंधित आहे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×