Advertisements
Advertisements
Question
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:
(य) प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथालेखनामागील हेतू लिहा. (१)
(र) कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. (१)
|
प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक ही असते. थोडक्यात सांगायचे तर ....... कथा म्हणजे ....... ‘एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखादया विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.’ अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखादया कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची ही असू शकते. |
(२) ‘कथा’ - व्याख्या लिहा. (२)
Advertisements
Solution
(१)
(य) प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले.
(र) कथेचे शीर्षक हे कथेचा आशय स्पष्ट करणारे, उत्कंठा वाढवणारे आणि वाचकांना आकर्षित करणारे असावे.
(२) कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखादया विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण.
