English

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (य) अधिकाधिक लोकांना आकर्षित करणारी कथाकथनाची लोकप्रिय माध्यमे लिहा. (१) - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:  

(य) अधिकाधिक लोकांना आकर्षित करणारी कथाकथनाची लोकप्रिय माध्यमे लिहा.  (१)

(र) कथावाचनाला इतर कलांची जोड दिल्यास श्रोत्यांवर होणारा परिणाम लिहा.  (१)

कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यांमुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते.

अलीकडच्या काळात ‘कथाकथन’ क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करीत आहे. या पार्श्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो.

अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते.

(२) कथाकथनाचे तंत्र अवगत करून घेण्यासाठी आवश्यक असणारे घटक लिहा.   (२)

Comprehension
Advertisements

Solution

(१) 

(य) आकाशवाणी व दूरदर्शन ही अधिकाधिक लोकांना आकर्षित करणारी कथाकथनाची लोकप्रिय माध्यमे आहेत.

(र) कथावाचनाला पार्श्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते.

(२)

कथाकथन करणाऱ्याने सर्वप्रथम श्रोत्यांचे वय, आवड आणि समज लक्षात घ्यावे. त्यानुसार योग्य कथा निवडावी. कथाकथनाचा वेळ आणि श्रोत्यांचे लक्ष किती काळ टिकते, याचाही विचार करणे आवश्यक आहे. कथा सांगताना श्रोत्यांशी संवाद साधत आणि त्यांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देत कथन करावे लागते. त्यामुळे शब्दांचा योग्य वापर, प्रभावी उच्चार, आवाजातील चढ-उतार आणि स्पष्टता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. म्हणून कथाकथन करणाऱ्याकडे वाचिक अभिनयाचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

याशिवाय, कथा सांगताना हातात लिखित मजकूर नसतो; त्यामुळे कथाकाराचे पाठांतर भक्कम असणे आवश्यक आहे. या सर्व बाबींची जाणीव ठेवून आणि योग्य तयारी करूनच कथाकथनाचे कौशल्य आत्मसात करता येते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×