Advertisements
Advertisements
Question
फुलं सोन्याची, झेंडू तोडते बाई
तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते.
वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
Advertisements
Solution
आशयसौंदर्य: ‘रोज मातीत’ या कवितेत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टमय आयुष्याचे प्रभावी चित्रण केले आहे. दिलेल्या ओळींमध्ये शेतात तिचे जगणे किती श्रमपूर्ण आणि जिवापाड परिश्रमांनी भरलेले असते, हे हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त झाले आहे.
काव्यसौंदर्य: सोन्यासारखी पिवळी झेंडूची फुले तोडून ती परडीत जमा करताना, जणू ती स्वतःचाच एक भाग देठापासून वेगळा करत आहे, अशी तीव्र भावना व्यक्त झाली आहे. खुडलेल्या टवटवीत झेंडूच्या फुलांची पताका करून, त्यांची माळ गुंफून ती घराच्या दाराशी तोरण बांधते. घराचा उत्सव ती मनापासून आणि पूर्ण ताकदीने साजरा करते. काळ्याभोर मातीत तिचे रोजचे जगणे, वावरणे आणि राबणे चालू असते.
भाषासौंदर्य: कवितेतील शेतकरीण अतिशय साध्या आणि सरळ भाषेत आपले मनोगत मांडते. तिच्या शब्दांतून तिच्या कष्टांचे आणि वेदनांचे चित्र स्पष्ट होते. कवयित्रीने लोकगीतातील सैल छंदाचा वापर करून अभिव्यक्ती अधिक प्रभावी केली आहे. नादमय शब्दरचना ही या कवितेची खास वैशिष्ट्ये आहेत. “हिरवे होऊन मागे उरणे” आणि “रोज मातीत नांदणे” या प्रतिमा मन हेलावून टाकतात. या जिवंत शब्दचित्रांमधून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर उभे राहते.
