English

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (१) आनंद अनुभवण्याची निमित्तं - (२) (य) ............ (र) ............ (२) विधाने पूर्ण करा - (२) (य) आई-वडील खंतावतात, जेव्हा ............ - Marathi

Advertisements
Advertisements

Question

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) आनंद अनुभवण्याची निमित्तं -  (२)

(य) ............

(र) ............

(२) विधाने पूर्ण करा -  (२)

(य) आई-वडील खंतावतात, जेव्हा ............

(र) आपण आनंदाला पारख होतो, जेव्हा ............

पैशाशिवाय जो आनंद राहू शकतो, तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाटी तर कितीही पैसे मिळाले, तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या, अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं? अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. २ × २ = ४ असा आनंदाचा गुणकार होतो; पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं, तरी गुणाकार शून्यच येणार.

यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच. टिकाऊ असला तरच तो खरा आनंद.

एखादया ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे; पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला, की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.

आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्त्व आहे - ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो, तेच क्षत्र निवडा. स्वत:च्या आवडीचं काम निवडा, केवळ आई-वडिलांची इच्छा म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं? त्याला वाटतं आपण आई-वडिलांच्या आनंदासाठी हे केलं; पण जेव्हा आई-वडिलांना जाणवतं, की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतावतातच.

(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)

‘एखादया ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगण आहे,’ या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

किंवा

खरा टिकाऊ आनंद मिळविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

Comprehension
Advertisements

Solution

(१) आनंद अनुभवण्याची निमित्तं - 

(य) यश

(र) वैभव

(२) 

(य) आई-वडील खंतावतात, जेव्हा मुलगा खरा आनंद नसतो.

(र) आपण आनंदाला पारख होतो, जेव्हा आपण अधिक पैशाच्या पाठी धावतो.

(३) 

एखाद्या ध्येयाने किंवा स्वप्नाने भारावून जाऊन त्याची पूर्तता करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे, हेच खरे माणसाचे जीवन होय. कारण ध्येय आणि स्वप्न माणसाच्या आयुष्याला दिशा देतात, त्याला आकार देतात. त्या सततच्या प्रयत्नांतूनच माणूस घडत जातो.

परंतु आपण आवडीच्या विषयात शिक्षण घेतले असले तरी आपल्याला नोकरी किंवा व्यवसायही आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे कधी कधी मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते.

अशा वेळी निराशा आणि अपयश यांसारख्या नकारात्मक भावना दूर सारून सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक असते. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून तिला यशात परिवर्तित करणे, हे मोठे कौशल्य आहे. त्यासाठी आपल्या वाट्याला आलेले काम आनंदाने स्वीकारले पाहिजे. आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा पूर्ण वापर केला पाहिजे. तसेच नवीन कौशल्ये शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. उत्कृष्ट काम करण्याचा ध्यास घेतला, तर आपले काम अधिक सुंदर होईल. त्यातून समाधान मिळेल आणि कामाला प्रतिष्ठाही प्राप्त होईल.

या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे माणूस आपल्या ध्येयाच्या अधिक जवळ पोहोचतो. त्याचे जीवन आणि जीवनमान उंचावते. तो अधिक सक्षम आणि आनंदी व्यक्ती बनतो.

किंवा

खरा आणि टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपले शरीर स्वच्छ, नीटनेटके आणि प्रसन्न ठेवले पाहिजे. आपल्याकडे पाहून इतरांनाही आनंद वाटला पाहिजे. यासाठी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. दररोज नियमित योगासने किंवा इतर व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच मनात ईर्ष्या, असूया, हेवा, मत्सर किंवा सूड यांसारख्या नकारात्मक भावना ठेवू नयेत.

यश आणि वैभव या बाह्य गोष्टी आहेत; त्यांचा अंतर्मनातील समाधानाशी थेट संबंध नसतो. त्यामुळे अधिक यश किंवा अधिक संपत्ती यांच्या मागे अंधपणे धावण्याऐवजी आपल्याला नेमके काय हवे आहे, याचा शांतपणे विचार केला पाहिजे.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की पैशाने खरा आणि चिरस्थायी आनंद मिळत नाही. आपल्या मनाला समाधान देणारे, आवडते काम निवडावे आणि मिळालेले कामही आनंदाने व मनापासून करावे.

ही सर्व पथ्ये प्रामाणिकपणे पाळली, तर आपण खऱ्या आनंदाच्या अधिक जवळ जाऊ शकतो.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×