Advertisements
Advertisements
Question
खालील उतारा वाचून त्यावर आधारित चार प्रश्न असे तयार करा की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील.
| प्रश्नांचा जन्म जिज्ञासेतून होतो. जिज्ञासा ही कोणत्याही शोधाची जननी असते. जिज्ञासा ही ज्ञानाची गंगोत्री असते. प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान संपादन घडून येते. लहान मुलांच्या मनात तर सदोदित असंख्य प्रश्न उमटत असतात. जिज्ञासेपोटी, कुतूहलापोटी ती सतत प्रश्न विचारीत असतात. प्रश्नांच्या माध्यमातूनच सर्जनशीलता बहरास येत असते. प्रश्न हे केवळ ज्ञानप्राप्तीच करून देतात असे नव्हे तर प्रश्नांमुळेच सर्जनशीलतेची कवाडे उघडली जातात. प्रश्नांमुळेच कोणत्याही गोष्टींची सखोल चिकित्सा केली जाते. मानवी संस्कृतीचा आणि ज्ञानसंपादनाचा सर्जनशील अविष्कार हा प्रश्नार्थक वृत्तीतूनच घडून आला आहे. प्रश्न हे ज्ञानसंपादनासही प्रवृत्त करतात. |
Very Short Answer
Advertisements
Solution
- प्रश्नांचा जन्म कशातून होतो?
- जिज्ञासा कशी असते?
- प्रश्नांमुळे काय साध्य होते?
- मानवी संस्कृतीचा सर्वांगीण विकास कशामुळे झाला आहे?
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
