English

खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.

रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही दुसर्‍याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो आजचा दिवस आपला आहे या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा दुसऱ्यांना आनंद सुखसमाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे
Short Answer
Advertisements

Solution

रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की, मन कसे प्रसन्न होऊन जाते, आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते, त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते, आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते, पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसर्‍याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते, ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की "मुलांनो, आजचा दिवस आपला आहे, या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा, दुसऱ्यांना आनंद, सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे". 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: सुरांची जादूगिरी - वाचा. [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 सुरांची जादूगिरी
वाचा. | Q १. | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×