Advertisements
Advertisements
Question
खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा व वाचा.
| आवडले का तुला जेवण सागरला आई म्हणाली सागर म्हणाला आवडले ना खूपच चविष्ट जेवण होते आजचे अहाहा साऱ्या भाज्या सुरेख झाल्या होत्या बटाट्याची भाजी तर छानच शेवयाची खीर चटणी कोशिंबीर आमटी सारं छान झालं होतं आई तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे आज खरच माझं पोट खूप भरलंय |
Advertisements
Solution
“आवडले का तुला जेवण?” सागरला आई म्हणाली. सागर म्हणाला, “आवडले ना! खूपच चविष्ट जेवण होते आजचे! अहाहा! साऱ्या भाज्या सुरेख झाल्या होत्या. बटाट्याची भाजी तर छानच! शेवयाची खीर, चटणी, कोशिंबीर, आमटी सारं छान झालं होतं. आई, तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे! आज खरंच माझं पोट खूप भरलंय.”
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
, - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
: - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“....” - ______
योग्य विरामचिन्हे वापरा.
सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी
योग्य विरामचिन्हे वापरा.
अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे
चुकीचे विरामचिन्ह बदला.
'आता कसं बोललात!' ते म्हणाले.
चुकीचे विरामचिन्ह बदला.
तिला म्हटले, 'कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसं वाटत नाही!'
योग्य विरामचिन्हे वापरा.
कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतातील सैन्यदल आणि आपली वर्दी
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
; - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
तू केव्हा, आलीस
खालील चिन्हांचे नाव लिहा:
‘......’ -
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
रमा म्हणाली मला ही साडी खूप आवडली.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
या शाली घेऊन घेऊन आता मी ‘शालीन’ बनू लागलो आहे.
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
समीर म्हणाला आता आपण सारे खेळूया
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर !
योग्य जोड्या लावा.
| विरामचिन्हे | विरामचिन्हाचे नाव |
| . | एकेरी अवतरण |
| ; | प्रश्नचिन्ह |
| ! | पूर्णविराम |
| ? | उद्गारवाचक चिन्ह |
| ‘ ’ | अर्धविराम |
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
स्वयंपाक करणे. पाट्यावर वाटणे. धान्य कांडणे अशा कितीतरी गोष्टी मी शिकले?
