English

खालील मध्ये फरक स्पष्ट करा. भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे व्यसन - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील मध्ये फरक स्पष्ट करा.

भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे व्यसन

Distinguish Between
Advertisements

Solution

  भ्रमणध्वनीचे व्यसन अंमली पदार्थांचे व्यसन
१. विविध कारणांमुळे मोबाईल फोनचे वेड लागणे आणि सतत आपला फोन अपग्रेड करण्याची इच्छा असणे, कारण हे उपकरण आता प्रतिष्ठेचे प्रतीक (Status Symbol) बनले आहे. अमली पदार्थांचे व्यसन म्हणजे पदार्थांवरील शारीरिक आणि जैविक अवलंबित्व होय. जेव्हा एखादी व्यक्ती या पदार्थांचे सेवन थांबवते, तेव्हा तिला अत्यंत त्रासदायक लक्षणे जाणवतात.
२. इंटरनेटच्या सुलभ उपलब्धतेमुळे माहितीचा महापूर आला आहे, ज्याचा वापर विध्वंसक आणि नकारात्मक स्वार्थासाठी केला जातो. सवंगड्यांचा दबाव (Peer Pressure), कुतूहल, नैराश्य, न्यूनगंड किंवा अहंगंड यांसारखी वैयक्तिक आणि मानसिक परिस्थिती ही या व्यसनाची कारणे आहेत.
३. सतत कॉलवर असणे, सायबरसेक्‍सचे व्यसन, ऑनलाईन सक्ती, आभासी संबंध इ. मोबाईल व्यसनी लोकांवर होणारे परिणाम आहेत. अमली पदार्थांवर अवलंबून राहणे, ताणतणाव, चिंता, आक्रमकता किंवा चिडचिड होणे. कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता, हे याचे परिणाम आहेत.
४. स्व-मूल्यमापन आणि छंद वर्ग, क्रीडा आणि खेळांसारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने सकारात्मक अनुभव मिळतात, जे एकटेपणा दूर करून मोबाईल व्यसन कमी करण्यास मदत करतात. जनजगृती करणे, समुपदेशन, कडक कायदे, व्यसनमुक्ती केंद्रे आणि प्रसारमाध्यमे ही अमली पदार्थांचे व्यसन रोखण्याचे उपाय आहेत.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×