English

कारणे लिहा. मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली. - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

कारणे लिहा.

मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. मुघलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले.
  2. त्यांना मराठ्यांचे काही सरदार येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाईनी शाहू महाराजांचा छत्रपतीपदावरील हक्क मान्य केला नाही.
  3. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेडे येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली.
  4. या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले. स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली.
  5. काही काळ शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला. इ.स. १७१० मध्ये महाराणी ताराबाईनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी (दुसरा) यास छत्रपती म्हणून घोषित केले. तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्याशेजारी कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

अशाप्रकारे, कोल्हापूर आणि दुसरी सातारा अशी दोन स्वतंत्र मराठा राज्ये निर्माण झाली.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 14: मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार - स्वाध्याय [Page 120]

APPEARS IN

Balbharati Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 14 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
स्वाध्याय | Q ४. (१) | Page 120
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×