Advertisements
Advertisements
Question
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या - (२)
(य) ______
(र) ______
(२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया - (२)
(य) ______
(र) ______
|
दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’ |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘यापुढे दंतसप्ताह नाही,’ लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.
Advertisements
Solution
(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या -
(य) दात उपटून हातात ठेवीन
(र) दात घशात घालीन
(२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया -
(य) हिरड्यांत इंजेक्शन दिले
(र) लीलया दात उपटला
(३) दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. लेखकाची दातदुखी सुरू होताच शेजारीपाजाराही जमत असत, चौकशी करत, कोणते उपचार कसे करावेत या विषयीही सल्ले देत मात्र लेखकाची दातदुखी तात्पुरती कमी होई व नंतर पुन्हा दातदुखी सुरू होत असे त्यामुळे शेवटी लेखक दंतवैद्याशी चर्चा करून दात काढून टाकण्याचा निर्णय घेतात. दंतवैद्याबद्दल मनात भीती वाटत असली तरी दंतवैद्याने सहजपणे काढून टाकलेला दात पाहून लेखक आश्चर्यचकित झाले.
आता मात्र पुन्हा दाताला ठगका लागणार नाही. उपचारास्तव पुन्हा दाताखाली बोळे धरावे लागणार नाही आणि बायकोचा उपदेश ही ऐकावा लागणार नाही या विचाराने लेखक आनंदी झाले. लेखक घरी आनंदात आले आणि त्यांनी शेजाऱ्यांना आपल्या दारातूनच सांगितले की, ‘रात्री तुम्हाला जागवणारा दात गेला’, यापुढे दंतसप्ताह होणार नाही. असे ओरडून सांगितले. याचे कारण म्हणजे लेखकाची दातदुखी सुरू झाली की शेजाऱ्यांचेही जागरण होत असे. अशाप्रकारे आपल्या दाताविषयी लेखकाने शेजाऱ्यांना ओरडून सांगितले.
किंवा
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.
दातदुखी, दाढदुखी ठणके जीव घेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे शोधा व लिहा.
लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण...
कारणे शोधा व लिहा.
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण...
कृती करा.
दातांशी निगडित म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये
कृती करा.
दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना
कृती करा.
दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
परशाची स्वभाववैशिष्ट्ये
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते सहावे महाभूत. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. ______
चौकटी पूर्ण करा.
ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. ______
स्वमत.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
स्वमत.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
स्वमत.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
अभिव्यक्ती.
प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
|
आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, की दहा-बारा वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या, त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती; पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’ |
(१) (२)
(i)

(ii)

(२) दंतवैद्याने दात काढल्यानंतर लेखक आश्चर्यचकित का झाले? (२)
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
लेखकाच्या मनातील दंतवैद्याविषयाची प्रतिक्रिया तुमच्या भाषेत लिहा.
किंवा
लेखकाने शेजाऱ्यांना ओरडून काय सांगितले? उदाहरणासह लिहा.
