English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

दिलेल्या अपठित उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा. शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा बोलते. म्हणूनच आपल्याला रडण्यासाठी जिवलग व्यक्तीचा खांदा लागतो - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

दिलेल्या अपठित उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा बोलते. म्हणूनच आपल्याला रडण्यासाठी जिवलग व्यक्तीचा खांदा लागतो आणि शारीरिकच काय, पण मानसिक आधारासाठीसुद्‌धा हातात हात लागतो. एखादया व्यक्तीचा हात हातात घेण्याने काही आठवणी जाग्या होत असतात. आजच्या अंगाखांद्यावर खेळलेली नातवंडं मोठी झाल्यावर जेव्हा आजीचा हात हातात घेतात, तेव्हा कवी बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर’ अशीच तिची अवस्था होत असेल. 

कोऱ्या वह्या-पुस्तकांचा स्पर्श, तलम साडीचा स्पर्श, मऊ हिरवळीचा अनवाणी पायांना होणारा लुसलुशीत स्पर्श, धबधब्याच्या थंडगार पाण्याच्या माऱ्याचा स्पर्श असे कितीतरी आनंददायक स्पर्श मनात रेंगाळत राहतात. या आठवणींच्या अत्तराची मनात दडवून ठेवलेली कुपी हलकेच उघडते आणि मनभर सुगंध दरवळतो.

Writing Skills
Advertisements

Solution

शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा मनाला भिडणारी असते. माणसाला जगण्यासाठी अन्न-वस्त्राइतकीच मानसिक आधाराचीही गरज असते आणि तो आधार स्पर्शातून मिळतो. एखाद्याचा हात हातात घेतल्यावर अनेक आठवणी जाग्या होतात. लहानपणी आजीच्या हाताचा स्पर्श, तिचे प्रेम आणि जिव्हाळा मनात कायमचे साठून राहतात. तसेच कोऱ्या वह्यांचा, तलम साडीचा, मऊ हिरवळीचा किंवा पावसाच्या पाण्याचा स्पर्शही आनंद देणारा असतो. अशा विविध स्पर्शांच्या आठवणी मनात दडलेल्या भावनांना जागवतात आणि मन प्रसन्न, सुगंधित करून टाकतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×