Advertisements
Advertisements
Question
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
|
अक्षरधारा वाचनालय चिपळूण शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा |
यश/इरा गुप्ते, तुमच्या मित्राला/मैत्रिणीला क्तृत्वस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. [email protected] या मेल आयडी वर हे पत्र पाठवा.
Advertisements
Solution
दिनांक - १५ फेब्रुवारी २०२५
प्रिय ओजस,
ई-मेल - [email protected]
विषय: वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन
सप्रेम नमस्कार,
ओजस, तुला मनःपूर्वक अभिनंदन!
अक्षरधारा वाचनालयातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत तू प्रथम क्रमांक मिळवलास, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. वाचनालयाच्या सभागृहात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात तुला सन्मानित करण्यात आले, असे समजले आणि मला खूप आनंद झाला.
तुझी उत्कृष्ट स्मरणशक्ती, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी यांमुळे तुझे भाषण विशेष प्रभावी ठरले. तू अनेक आंतरशालेय स्पर्धांमध्ये नियमितपणे सहभागी होत असतोस आणि श्रोत्यांवर तुझ्या भाषणाचा गहिरा प्रभाव पडतो. त्यामुळे तुझे भाषण ऐकत राहावेसे वाटते.
भविष्यात तू व्याख्याता किंवा निवेदक म्हणून मोठे यश संपादन करशील, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा तुझे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
तुझी मैत्रीण,
इरा गुप्ते,
201, शिवाजी नगर,
लोकमान्य टिळक भवनाजवळ,
चिपळूण,
ई-मेल - [email protected]
