English

अभिव्यक्ती. निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

अभिव्यक्ती.

निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्परसंबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

Answer in Brief
Advertisements

Solution

मला कळू लागले तेव्हापासूनचे सर्व आठवते. कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की, मला प्रचंड आनंद होतो. खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते, असे नाही. आमच्या वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणींना सहलीचा विषय आला की, अमाप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की, खूप आनंद मिळतो. नदीत डुंबायला मिळाले तर कितीही वेळ डुंबत राहावेसे वाटते. तेच रानावनात भटकतानाही वाटत असते. झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा येतच नाही. हिरव्यागार वृक्षवेलींनी सजलेला डोंगर पाहताना मन सुखावते. हे असे का होत असावे?

वनस्पती या सजीव आहेत; त्यांना माणसांसारख्याच भावभावना असतात. वनस्पतींनाही आनंद होतो, दुःख होते. त्यांच्यावर प्रेमाने हात फिरवला, तर त्याही सुखावतात, हे सर्व आता लहानथोरांपासून सर्वांनाच ठाऊक झाले आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. वृक्ष नष्ट होऊ लागले की माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की, माणसे खवळतात. शहरात माणसाला स्वत:चे वृक्षप्रेम जपता येत नाही, म्हणून माणसे कुंड्यांमध्ये रोपटी लावतात आणि त्यांचा आनंद घेतात. अमाप वृक्षतोड होऊ लागली, तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमीने 'चिपको आंदोलन' उभारले. त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकांच्या मनात हे एवढे वृक्षप्रेम दाटून आले, याचे कारणच हे की निसर्ग आणि आपण यांच्यात एक खोलवरचे नाते आहे. ज्या निसर्गाने माणसांना निर्माण केले, त्यानेच प्राण्यांना आणि वनस्पतींना निर्माण केले आहे. आपण सर्व निसर्गाची लेकरे आहोत. आपण, अन्य प्राणी आणि वनस्पती ही सर्व भावंडेच आहेत. आपणा सर्वांमध्ये हे असे रक्ताचेच नाते आहे. निसर्गच आपले पालनपोषण करतो. तोच अन्नपाणी देतो. तोच हवाही देतो. आपल्याला तोच जिवंत ठेवतो. आपल्या जगण्याचा आधारच निसर्ग हा आहे. हेच निसर्ग व मानव यांच्यातले नाते आहे.

shaalaa.com
रेशीमबंध
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.08: रेशीमबंध - कृती (६) [Page 39]

APPEARS IN

Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2.08 रेशीमबंध
कृती (६) | Q 1 | Page 39

RELATED QUESTIONS

कृती करा.

उत्तररात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये


कृती करा.

घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये


कृती करा.

चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये


कृती करा.

उत्तररात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रशन


कारणे शोधा व लिहा.

पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण...


कारणे शोधा व लिहा.

मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण...


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

सायली -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

गुलमोहोर -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

जॅक्रांडा -


पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा.

चाफा -


वर्णन करा.

उत्तररात्रीचे आगमन


वर्णन करा.

पहाट व पाखरे यांच्यातील नात


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

वृक्ष-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

फुले-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

वेली-


खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेल्या मानवी क्रिया लिहा.

पाखरे-


स्वमत.

‘रेशीमबंध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.


अभिव्यक्ती.

डॉ. यू. म. पठाण यांच्या लेखनाची भाषिक वैशिष्ट्ये पाठाधारे स्पष्ट करा.


अभिव्यक्ती.

संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना ‘सोयरी’ असे म्हटले आहे, यामागील तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)

(य) ______

(र) ______

(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)

(य) ______

(र) ______

          सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’  पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल.

          हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो.

(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)

पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×