English

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?

Long Answer
Advertisements

Solution

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात-

  1. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे, त्यांत कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे.
  2. महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे.
  3. कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे.
  4. जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणे.
  5. अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अमलात आणणे.
  6. संगणकीय प्रणालीचा वापर करणे.
  7. विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे.
  8. राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे.
  9. अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे.
  10. कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे.
  11. महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे.
shaalaa.com
ग्रंथालये आणि अभिलेखागार
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - लांब उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
लांब उत्तरे २ | Q ५ २.
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
स्वाध्याय | Q ४. (२) | Page 66
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×