English

‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

Long Answer
Advertisements

Solution

  1. जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात, तसतशा जुन्या पिढ्या नष्ट होत जातात. आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पात घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडले आहेत.
  2. मुळात असलेले सजीव, त्यांच्यात असलेल्या आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे.
  3. औद्योगिकीकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळी खंडित झाली आहेत.
  4. मानवाच्या अफाट लोकसंख्यावाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही.
  5. परिणामी, जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत. हा विकास शाश्वत नाही.
  6. नैसर्गिक साधनसंपदांचा अवाजवी उपयोग केल्याने पुढच्या पिढ्यांना अशा संपदा उपलब्ध होणार नाहीत. उदा. जीवाश्म इंधने, विविध धातू इत्यादी.
  7. आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबाडून घेतल्यामुळे हवामान बदल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड द्यावे लागेल. म्हणून आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे.
  8. यालाच शाश्वत विकास असे म्हटले आहे. आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
shaalaa.com
पर्यावरण व परिसंस्था संबंध
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [Page 46]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 2 | Page 46
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×