Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
| आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासातील' पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ?' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं! पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. |
1. का ते लिहा. (2)
- डॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण ______
- 'शाळेत कसा जाऊ? ' असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण ______
2. आकृती पूर्ण करा. (2)

3. स्वमत: (3)
शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.
Advertisements
Solution
1.
- डॉ. माशेलकर हे सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांना आईबरोबर मुंबईला जावे लागले.
- वडिलांच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहासाठी मुंबईला आलेल्या माशेलकरांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती आणि कोणतीच फी भरणे त्यांना शक्य नव्हते.
2. 
3. डॉ. माशेलकर लहान असतानाच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. दारिद्र्यामुळे शाळेची फी भरणेदेखील त्यांना अवघड वाटत होते; मात्र दारिद्र्यातही त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा कमी झाली नव्हती. ते शिक्षणासाठी आसुसलेले होते. मोठ्या मुश्किलीने खेतवाडीतील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत त्यांना प्रवेश मिळाला आणि त्यांनी जिद्दीने आपले शिक्षण सुरू केले. पायात घालायला चप्पलही नाही अशी परिस्थिती असतानादेखील त्यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली. या सर्वांमधून माशेलकर यांची शिक्षणाविषयीची तीव्र आस्था आणि तळमळ तसेच कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द हे गुण जाणवतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.
| १ | २ | ३ | ४ | ५ |
| लेखकाची माध्यमिक शाळा | लेखकाला घडवणारे शिक्षक | लेखकाचे जन्मगाव | ऋण व्यक्त न करता येणाऱ्या व्यक्ती | मुंबईतील घराचे नाव |
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे लिहा.
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ______
कारणे लिहा.
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ______.
कारणे लिहा.
लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण _____________
‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.
'माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान', या विषयावर तुमचे विचार लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कृती पूर्ण करा. (०२)
वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू –
१. ______
२. ______
|
’ऑऽव्हऽऽ“ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं, की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा रानकुत्री अशा पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. |
२. चौकटी पूर्ण करा. (०२)
- वाघिणीचा आवाज – ______
- वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपवली – ______
३. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा. (०३)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कृती पूर्ण करा. (०२)
यापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी.
१. ______ २. ______
३. ______ ४. ______
|
साधारणत: कुत्रयापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽवऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. |
२. आकलन
चौकटी पूर्ण करा. (०२)
वाघिणीच्या पिल्लांचे खेळ
१ . ______ २.______
३. स्वमत (०३)
'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली' हे विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- ‘माशेल’ गाव सोडणारे - ______
- वयाच्या सहाव्या वर्षी वारणारे - ______
|
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं! पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत. (3)
‘शिक्षण घेण्यासाठी ‘गरिबी’ हा अडसर ठरत नाही’, या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. का ते लिहा. (2)
- भावे सर फक्त भौतिकशास्तराचे शिक्षकच नव्हते, कारण ______
- माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण ______
|
याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गाेडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, ‘‘माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.’’ एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)
लेखकांना शैक्षणिक जीवनात मोलाचे साहाय्य करणाऱ्या व्यक्तींबद्दलचे मत स्पष्ट करा.
