English

आचार्य अत्रे यांच्या 'आजीचे घड्याळ' या कवितेतील आजीचे घड्याळ नेमके कोणते ते शोधा. ही कविता इंटरनेट किंवा ग्रंथालयातील संदर्भ साहित्यातून शोधा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

आचार्य अत्रे यांच्या 'आजीचे घड्याळ' या कवितेतील आजीचे घड्याळ नेमके कोणते ते शोधा. ही कविता इंटरनेट किंवा ग्रंथालयातील संदर्भ साहित्यातून शोधा.

Short Answer
Advertisements

Solution

आजीचे घडयाळ

आजीच्या जवळी घडयाळ कसले आहे चमत्कारिक,

देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक;

त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,

किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी”,

जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी

साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी

बाळा झांजर जाहले,अरवला तो कोंबडा, ऊठ की !”

ताईची करण्यास जम्मततसे बाबूसवे भांडता

जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता!

आली ओटीवरी उन्हे बघ!” म्हणे आजी,”दहा वाजले!

जा जा लौकर!” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी

हो केव्हा तिनिसांज ते न समजे! आजी परी आंतुनी

बोले, “खेळ पुरेघरांत परता! झाली दिवेलागण,

ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन!”

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा

जाई झोप उडूनरात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !

अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली, ”गोष्टी पुरे! जा पडा!”

लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ,तशाच वार-तिथीही आजी घडयाळातुनी

थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी

मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?

गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो! तरी ना मिळे!

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: स्थानिक वेळ व प्रमाण वेळ - उपक्रम [Page 137]

APPEARS IN

Balbharati Bhugol Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
Chapter 1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
उपक्रम | Q (अ) | Page 137
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×