Advertisements
Advertisements
Question
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (४)
(१) चौकटी पूर्ण करा:
- सोनेरी मुकुट घालणारी -
- साळीवर झोपणारी -
|
पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर झाडांनी किति मुकुट घातले डोकिस सोनेरी हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे अशी अचल फुलपाखरे फुले साळिस जणु फुलती झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती! पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा. |
(२) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा:
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो 'सोन्याचा गोळा?'
Comprehension
Advertisements
Solution
-
- सोनेरी मुकुट घालणारी - झाडे
- साळीवर झोपणारी - फुलपाखरे
- कवी भा. रा. तांबे यांनी ‘सायंकाळची शोभा’ या कवितेत संध्याकाळच्या रम्य दृश्याचे सुंदर वर्णन केले आहे. सकाळी अन्न-पाण्यासाठी गेलेली पाखरे आता परत येऊन झाडांवर विसावली आहेत. पश्चिम दिशेला मावळणारा सूर्य एक झळाळता सोनेरी गोळा बनून अस्तास जात आहे. तो सूर्य एकदम कुठे अदृश्य झाला, हे पाहून निर्माण होणारं आश्चर्य कवितेच्या ओळींमधून व्यक्त करण्यात आलं आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
