SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)
Academic Year: 2024-2025
Date & Time: 25th June 2025, 11:00 am
Duration: 2h
Advertisements
कृतिपत्रिकेसाठी सूचना :-
- सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
- आकृत्या पेननेच काढाव्यात.
- उपयोजित लेखनातील प्रश्नांसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
- स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) उत्तर लिहा: 1
लेखकाला मिळालेली पदवी - ......
|
माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळाला, माझ्या व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी. लिट. मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, ‘संतसाहित्यचिंतना’ सारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संतसाहित्यविषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रणं आली, की त्या बातम्या सांगणारी जी पत्रं नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटं फोडून या बातम्या मी प्रथम कुणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला! मग मकबऱ्याचे मिनार मिस्कीलपणे हसत-डोलत. त्याचा घुमट तरारून येई. माझ्या यशानं त्यालाही तेज चढे. त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हाऊन निघत असे. माझ्या आयुष्यात या स्नेहाळ क्षणांना फार फार मोलाचं स्थान आहे. हे सारे क्षण मी माझ्या हृदयात खोल खोल जपून ठेवले आहेत, दडवून ठेवले आहेत. |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: 2

(3) स्वमत: 3
‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.
Chapter:
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) एका शब्दात उत्तर लिहा: 2
- मोराच्या ओरडण्याला म्हणतात - ......
- मोराचा आनंदाचा काळ - ......
|
मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. त्या वेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाची पूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काल आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी-नाले, ओहोळाचे काठ ही या वेळी मोराच्या स्वैर विहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून अर्धा ते दोन किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो आपला चारा दिवसाच शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो. पहाट होताच मोर जागा होतो. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बांग देतो. थोडा वेळ आपले पंख सावरून तो वरून खाली टेहळणी करतो. सूर्योदयापूर्वी अर्धा तास तो झाडाखाली उतरतो. |
(2) आकृतिबंध पूर्ण करा: 2

(3) उत्तरे लिहा: 2
- मोराच्या वावरण्याचा परिसर कोणता ते लिहा.
- मोर झाडावरून उतरण्याची वेळ लिहा.
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) खालील आकृती पूर्ण करा: 2

|
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा: 2
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।
Chapter:
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकटी पूर्ण करा: 2
- शेतकऱ्यावर कृपा करणारा - ......
- शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ......
|
हे आली रे आली, आली रे आली काळ्या मातीला हिरवा सुगंध नटलं घरदार शिवार सारं दोन हातांची किमया ही सारी काय कमतरता कोणाला आज |
(2) दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा: 2
काळ्या मातीला हिरवा सुगंध
या गंधात सारेच धुंद
नवनवतीचा साज हा ल्याली रे॥
Chapter:
सूचनेनुसार सोडवा:
शेवटी एकदाची शर्यत संपली. (काळ ओळखा)
Chapter:
सूचनेनुसार सोडवा:
मी अनाथांची आई होईन. (काळ ओळखा)
Chapter:
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा:
| वाक्प्रचार | वाक्प्रचारांचे अर्थ |
| (i) आकांत माजणे | (अ) निश्चय करणे |
| (ii) निर्धार करणे | (आ) आश्चर्यचकित होणे |
| (इ) खूप दु:ख होणे |
Chapter:
Advertisements
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा:
नेत्र = .....
Chapter:
पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
वजनदार
Chapter:
खाली दिलेल्या शब्दांमधून अचूक शब्द ओळखून लिहा:
पक्षि/पक्क्षी/पक्षी/पक्क्षि
Chapter:
पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:
| विरामचिन्ह | विरामचिन्हाचे नाव |
| ? | ............. |
Chapter:
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
| विरामचिन्ह | विरामचिन्हाचे नाव |
| . | ............. |
Chapter: [16] व्याकरण विभाग
Advertisements
|
झाडे लावा..... झाडे जगवा वन विभाग, औरंगाबाद यांचे तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त * रोपांचे मोफत वाटप * दिनांक 5 जून संपर्क: वन विभाग कार्यालय, उस्मानपूरा रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद -431001 |
अन्वर/सायरा खान, न्यू इंग्लिश स्कूल, औरंगाबाद विद्यार्थी प्रमुख या नात्याने शाळेसाठी रोपांची मागणी करणारे पत्र वन विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना लिहा.
Chapter:
|
झाडे लावा..... झाडे जगवा वन विभाग, औरंगाबाद यांचे तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त * रोपांचे मोफत वाटप * दिनांक 5 जून संपर्क: वन विभाग कार्यालय, उस्मानपूरा रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद -431001 |
अन्वर/सायरा खान, न्यू इंग्लिश स्कूल, औरंगाबाद विद्यार्थी प्रमुख या नात्याने ‘रोपांचे मोफत वाटप’ या चांगल्या उपक्रमाबाबत वन विभाग, औरंगाबाद यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Chapter:
खालील मुद्दे विचारात घेऊन कथालेखन करा.
| एक शेतकरी - खूप कष्टाळू - दोन मुले - खूप आळशी - शेतकऱ्यास चिंता - शेतकऱ्याचे आजारी पडणे - मुलांना जवळ बोलावणे - सर्व संपत्ती शेतात असल्याचे सांगणे - शेतकरी मरण पावणे - मुलांनी शेत खणून काढणे - पण संपत्ती न मिळणे - खूप निराश होणे - चांगला पाऊस - मुलांनी धान्य पेरले - चांगले धान्य - तात्पर्य. |
Chapter:
दिलेले मुद्दे लक्षात घेऊन खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार कराः

Chapter:
खालील विषयावर बातमी तयार करा:
तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या ‘वार्षिक पारितोषिक वितरण’ समारंभाची बातमी तयार करा.
Chapter:
पुढील उतारा वाचून एका वाक्यात उत्तर येईल, असे चार प्रश्न तयार करा.
|
मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत, म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले. खेळाचे साहित्य आणले. शिक्षकसुद्धा नेमले. पण शाळेत मुलेच येईनात. फक्त पाच-सहाचं मुले आली. बाकीची मुले रानात जात; गुरे राखत. आई वडिलांना शेतीत मदत करीत. संत गाडगेबाबांनी सर्व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मग त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले. |
Chapter:
खालील विषयावर निबंधलेखन करा.
आत्मकथन:
| फूल |
चौकटीतील घटक तुमच्याशी बोलत आहे, अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
Chapter:
Other Solutions
Submit Question Paper
Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help studentsonly jpg, png and pdf files
Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] with solutions 2024 - 2025
Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard -2025 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
By referring the question paper Solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard.
How Maharashtra State Board 10th Standard Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.

