मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) उत्तर लिहा: 1 लेखकाला मिळालेली पदवी - ...... माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळाला, माझ्या व्याख्यानमाला गाजल्या, - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) उत्तर लिहा: 1

लेखकाला मिळालेली पदवी - ......

माझ्या ग्रंथाला राज्यपुरस्कार मिळाला, माझ्या व्याख्यानमाला गाजल्या, आदर्श प्राध्यापक म्हणून माझा गौरव झाला, मला डी. लिट. मिळाली, राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून माझा सन्मान झाला, ‘संतसाहित्यचिंतना’ सारख्या माझ्या पुस्तकाला श्रेष्ठ संतसाहित्यविषयक ग्रंथाचा पुरस्कार मिळाला, मला परदेशाची निमंत्रणं आली, की त्या बातम्या सांगणारी जी पत्रं नि तारा माझ्या टेबलावर येऊन पडत, ती पाकिटं फोडून या बातम्या मी प्रथम कुणाला सांगत असे? काचेच्या खिडकीतून माझ्याकडे टक लावून पाहणाऱ्या मकबऱ्याला! मग मकबऱ्याचे मिनार मिस्कीलपणे हसत-डोलत. त्याचा घुमट तरारून येई. माझ्या यशानं त्यालाही तेज चढे. त्याच्या स्नेहशील दृष्टीच्या वर्षावात मी अखंड न्हाऊन निघत असे. माझ्या आयुष्यात या स्नेहाळ क्षणांना फार फार मोलाचं स्थान आहे. हे सारे क्षण मी माझ्या हृदयात खोल खोल जपून ठेवले आहेत, दडवून ठेवले आहेत.

(2) आकृतिबंध पूर्ण करा: 2

(3) स्वमत: 3

‘मकबरा आणि लेखक’ यांच्यातील मैत्रीचे नाते तुमच्या शब्दांत लिहा.

आकलन
Advertisements

उत्तर

(1) 

लेखकाला मिळालेली पदवी - डी. लिट.

(2) 

(3)

मकबरा आणि लेखक यांची मैत्री जवळजवळ पंचवीस-तीस वर्षांची आहे. या काळात त्यांना कधीही एकमेकांचा कंटाळा आला नाही. लेखक विद्यापीठात जाताना रोज मकबऱ्याचे दर्शन घेतो. दररोजची ही भेट जणू जिवलग मित्रांच्या भेटीसारखीच असते. त्यांची ही घट्ट मैत्री फक्त त्यांनाच ठाऊक आहे. दररोज एकमेकांना पाहिल्याशिवाय दोघांनाही समाधान मिळत नाही. जणू मकबऱ्याला दिवसभरात घडलेल्या घटना लेखकाला सांगायच्या असतात. आज काय घडले, कोणते परदेशी पाहुणे आले, अशी सारी माहिती तो जणू सांगत असतो. दोघेही एकमेकांची आतुरतेने वाट पाहतात. त्यांच्यात शब्दांविना सतत संवाद चालू असतो. ते एकमेकांच्या अस्तित्वाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे एखाद्या दिवशी मकबऱ्याचे दर्शन झाले नाही, तर लेखकाला खूप खिन्न वाटते. अशा प्रकारे मकबरा आणि लेखक यांची मैत्री अत्यंत गाढ आणि जिव्हाळ्याची आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×