मराठी

Marathi Official Question Paper 2025-2026 HSC Commerce (English Medium) 12th Standard Board Exam Question Paper Solution

Advertisements
Marathi [Official Question Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Commerce (English Medium)
HSC Science (General)
HSC Arts (English Medium)
HSC Arts (Marathi Medium)
HSC Commerce (Marathi Medium)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 12th February 2026, 11:00 am
Duration: 3h
Advertisements

कृतिपत्रिकेसाठी सूचना: 

  1. आकलन कृती व्याकरण यांमधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. 
  2. स्वच्छता, नीटनेटकेपणा लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दयावे.

विभाग १ - गद्य (20 गुण)
[8]१. (अ)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे -    (२)

(२) जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र -    (२)

कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते; पण आहेच वाहन तर चार-सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहाण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत?

वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल, तर तातडीचा भाग म्हणून कधी तरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल, तर वाहनाचा उपयोग होईल; पण सहज आणि सुखाने येणे-जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत.

(३) स्वमत अभिव्यक्ती -    (४)

‘जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो,’ - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

किंवा

‘मनाचा ब्रेक - उत्तम ब्रेक’ याबाबतची तुमची भूमिका सोदाहरण लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[8]१. (आ)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत -    (२)

(य) ..........

(र) ..........

(२) चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य -    (२)

(य) ..........

(र) ..........

मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो. तिथेही या चित्रांचे स्त्रोत मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो होतो. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार पाचसात वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली! हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं. कार्यक्रम संपला. घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री दहानंतर मी समोर ड्रॉईंगपेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो ते अशा क्रमानं. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याच बरोबर मी दुसरा एक हात दाखवलाय ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं.

(३) स्वमत अभिव्यक्ती -    (४)

लेखकाने चित्रातून स्त्रीभ्रूण हत्ये विरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

‘समाजातील अनिष्ट रूढी’ याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]१. (इ)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख:    (२)

(य) ..........

(र) ..........

छोटेसे का होईना पण स्वत:चे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून मीही अशा भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो.

अर्थात  हे भाग्य असेतसे आले नव्हते. बंगल्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी मी निरनिराळ्या ठिकाणांहून इतकी कर्जे काढली होती की, जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे वा कॉम्प्युटरचे ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने कर्जाचे व हप्त्यांचे ठरले होते. असे असूनही, आणखी एक कर्ज काढून मी दणक्यात वास्तुशांत केली अन्‌ बंगल्यात राहायला गेलो. आसपास थोडीफार वस्ती होऊ घातली असली तरी माझा बंगला त्या माळरानावर ओकाबोकाच वाटत होता. बंगल्याच्या आवारातच काय, पण बाहेर एकही झाड नव्हते ना झुडूप होते. सोयी गैरसोयीही बऱ्याच होत्या, तरी सुद्धा ..... इट वॉज माय स्वीट ...... स्वीट होम!

-अविनाश हळबे.

(२) लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले -    (२)

कारण - ..................................

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग २ - पद्य (16 गुण)
[8]२. (अ)

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) चौकटी पूर्ण करा -    (२)

आषाढघनाच्या पदविन्यासखुणा -

(य) ..........

(र) ..........

(२) कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे -    (२)

(य) .......... (र) ..........

रे थांब जरा आषाढघना
बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंचीं हीं शेतें
प्रवाळमातीमधलीं औतें
इंद्रनीळ वेळूंचीं बेटें
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुलीं ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उघड गगन, कर घडिभर आसर
आणि खुलें कर वासरमणि - घर
वाहूं देया तव किमयेवर
कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
आश्‍लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनी
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना
काळोखाचीं पीत आंसवें
पलवींत उमलतां काजवे
करुं दे मज हितगूज त्यांसवें
निरखीत जळांतिल विधुवदना

(३) अभिव्यक्ती:    (४)

आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]२. (आ)

खालील ओळींचा अर्थ लिहा:

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे; 
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हे कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
[4]2. (इ) (i) | काव्यसौंदर्य:

समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.

या ओळींतून सूचित होणारे भावसौंदर्य उलगडून दाखवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
किंवा
[4]2. (इ) (ii) | रसग्रहण:

पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका
अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू .... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी ! 

वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग ३ - साहित्यप्रकार: कथा (10 गुण)
[4]३. (अ)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) एका वाक्यात उत्तरे लिहा:

(य) प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथालेखनामागील हेतू लिहा.    (१)

(र) कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा.    (१)

प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या.

कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत! अर्थात या सर्व घटकांनी युक्‍त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक ही असते.

थोडक्यात सांगायचे तर ....... कथा म्हणजे ....... ‘एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखादया विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.’

अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखादया कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची ही असू शकते.

(२) ‘कथा’ - व्याख्या लिहा.    (२)

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]३. (आ) | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[3]३. (आ) (य)

‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.

Concept: undefined - undefined
Chapter: [3.01] शोध
[3]३. (आ) (र)

बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (आ) (ल)

डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अनुने सांगितलेला फरक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]३. (आ) (व)

‘गढी’ पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.

Concept: undefined - undefined
Chapter: [3.02] गढी
Advertisements
विभाग ४ - उपयोजित मराठी (14 गुण)
[4]४. (अ) | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[2]४. (अ) (१)

मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (अ) (२)

माहितीपत्रकाची गरज विशद करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (अ) (३)

अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]४. (अ) (४)

वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [4.04] वृत्तलेख (फिचर रायटिंग)
[10]४. (आ) | खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
[5]४. (आ) (१)

खालील मुद्द्यांच्या आधारे “मुलाखतीचे स्वरूप” विशद करा.

मुलाखत म्हणजे ......... मुलाखतीचे विविधांगी स्वरूप ......... मुलाखतीचे विविध प्रकार .......... साधारण ते असाधारण व्यक्ती .............. आगळे वेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]४. (आ) (२)

खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.

Concept: undefined - undefined
Chapter: [4.02] माहितीपत्रक
[5]४. (आ) (३)

खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा: 

वस्तुनिष्ठता ........... विश्‍वसनीयता ............. सोपेपणा ............. शब्दमर्यादा .............. निःपक्षपातीपणा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]४. (आ) (४)

खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्त्रोत लिहा:

वृत्त किंवा बातमी ............ व्यक्तिगत अनुभव ............ भेटीगाठी ............ मुलाखती ............ निरीक्षणे.

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग ५ - व्याकरण व लेखन (20 गुण)
व्याकरण घटक व वाकप्रचार
[10]५. (अ) | सूचनेनुसार कृती करा:
[1]५. (अ) (१) (य) | योग्य पर्याय निवडा:

ही इमारत खूपच उंच आहे. 

वरील विधानाचे उद्‌गारार्थी वाक्य ओळखून लिहा:

ही इमारत काही कमी उंच नाही.

ही इमारत किती उंच आहे.

किती लहान आहे ही इमारत.

बापरे! केवढी उंच आहे ही इमारत!

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (१) (र) | सूचनेप्रमाणे सोडवा:

तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. 

(नकारार्थी वाक्य करा.)

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]५. (अ) (२) (य) | योग्य पर्याय निवडा:

‘गोपाल’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा.

अव्ययीभाव समास

द्वंद्व समास

बहुव्रीही समास

तत्पुरुष समास

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (२) (र)

‘यथाशक्ती’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (३) (य) | योग्य पर्याय निवडा:

दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला. 

या वाक्यातील प्रयोग ओळखा:

कर्तरी प्रयोग

कर्मणी प्रयोग

भावे प्रयोग

यांपैकी नाही

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (३) (र)

कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा:

सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.

शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली.

आज लवकर सांजावले.

त्याने कपाटात पुस्तक ठेवले.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (४) (य) | योग्य पर्याय निवडा:

तदितर खग भेणे वेगळाले पळाले।
उपवन - जल - केली जे कराया मिळाले॥ 
स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो?

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा:

अतिशयोक्ती

अनन्वय

अपन्हुती

अर्थान्तरन्यास

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (४) (र)

‘आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी’ या वाक्यातील उपमान ओळखा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (५) (य)

‘साखरझोपेत असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा:

पहाटेच्या गाढ निद्रेत असणे.

दिवसा उजेडी झोपणे.

साखर खाऊन झोपणे.

दिवा स्वप्न पाहणे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]५. (अ) (५) (र)

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

साखरझोपेत असणे.

Concept: undefined - undefined
Chapter: [6] अतिरिक्त व्याकरण
[10]५. (आ) | खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:
[10]५. (आ) (१)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

रानफुलांचे सौंदर्य

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) (२)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

माझा आवडता साहित्यिक

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) (३)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

ग्रंथालयाचे मनोगत

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) (४)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

समुद्र आटला तर .......

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]५. (आ) (५)

खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा:

स्त्री-पुरुष समानता : काळाची गरज

Concept: undefined - undefined
Chapter:

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam Marathi with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Marathi board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi, you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam.

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×