मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (१) चौकटी पूर्ण करा - आषाढघनाच्या पदविन्यासखुणा - (य) .......... (र) .......... (२) कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे - (य) .......... (र) .......... - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) चौकटी पूर्ण करा -    (२)

आषाढघनाच्या पदविन्यासखुणा -

(य) ..........

(र) ..........

(२) कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे -    (२)

(य) .......... (र) ..........

रे थांब जरा आषाढघना
बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंचीं हीं शेतें
प्रवाळमातीमधलीं औतें
इंद्रनीळ वेळूंचीं बेटें
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुलीं ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उघड गगन, कर घडिभर आसर
आणि खुलें कर वासरमणि - घर
वाहूं देया तव किमयेवर
कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णां
आश्‍लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनी
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना
काळोखाचीं पीत आंसवें
पलवींत उमलतां काजवे
करुं दे मज हितगूज त्यांसवें
निरखीत जळांतिल विधुवदना

(३) अभिव्यक्ती:    (४)

आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा.

आकलन
Advertisements

उत्तर

(१)

आषाढघनाच्या पदविन्यासखुणा -

(य) पावसाळी ऋतूची सुरुवात

(र) आषाढ महिन्याचा थंडावा आणि निसर्गातील बदल

(२) कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे -

(य) कमळ (र) जास्वंद

(३) आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू ‘कालिदास जयंतीला’ मी माझ्या गावी होतो. त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकटाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. ‘शिवानी टेकडी’ ही खूप निसर्गरम्य आहे. माथ्यावर दाट झाडी आहे. मी झाडाखाली बसून आकाश न्याहाळत होतो. अचानक चोहोबाजूंनी काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली.
आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकोळून गेली, झोंबणारे गार वारे चोहोकडून अंगावर आले नि टपटप टपटप टपोर थेंब बरसू लागले. मी छत्री नेली नव्हती, त्यामुळे यथेच्छ सचैल भिजायचे मी ठरवले. आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो. झाडांच्या फांदया घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती. घरट्यांतले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडीचूप होते. पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती नि आषाढमेघ मल्हार राग गात होते. मी डोळ्यांत ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होता. सडींचा तंबोरा लागला होता. मला वाटले मीपण त्या वृक्षराजीतले एक झाड आहे आणि मला आषाढमेघाचे फळ फुटले आहे. सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×